आमदाराने घेतल्या कार्यकर्त्याच्या चपला डाेक्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

बुलडाणा : 15 वर्षांच्या संषर्घानंतर आमदार झालेल्या शिवसेनेच्या बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्याच्या चपला डोक्यावर घेतल्या आणि त्याला त्या भेट दिल्या. 

जोपर्यंत संजय गायकवाड आमदार होत नाही तो पर्यंत पादत्राणे पायात घालणार नाही, असा प्रण घेऊन तब्बल 15 वर्षापासून अनवाणी पायांनी फिरणार्‍या कार्यकर्त्याला संजय गायकवाड आमदार होताच त्यांनी डोक्यावर पादत्राणे घेऊन त्याच्या गावाला भेट देत पाय धुवून पादत्राणे घातली. 15 वर्षापासून सुरू असलेल्या त्याचा प्रण तोडला. ही घटना मोताळा तालुक्यातील नेहरूनगर येथील रहिवासी असलेला अनिल शंकर पवार याची आहे.

अनिल पवार हा कार्यकर्ता संजय गायकवाड यांच्याशी गेल्या 15 वर्षापासून जुळला आहे. छावा संघटनेत असताना संजय गायकवाड यांनी 2004 मध्ये विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत थोड्या फरकाने गायकवाड यांचा पराभव झाल्यामुळे झालेला पराभव अनिल पवार यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर जो पर्यंत संजय गायकवाड आमदार होत नाही तो पर्यंत आपण पायात पादत्राणे घालणार नाही. असा प्रण त्याने घेतला होता.

अखेर संजय गायकवाड यांचा विधानसभेत विजय झाला आणि ते आमदार झाले. आमदार होताच आपल्या या निष्ठावंत गरीब कार्यकर्त्याची आठवण आमदार गायकवाड यांना झाली. विजयाच्या जल्लोषात न रमता अहोरात्र काम करणार्‍या या कार्यकर्त्याच्या गावात जाऊन गायकवाड यांनी स्वखर्चाने घेतलेले पादत्राणे डोक्यावर ठेवून त्याच्या घरापर्यंत पायी गेले. अनिल पवार याचे पाय धुवून त्याच्या पायात पादत्राणे घातले. नंतर शाल व श्रीफळ देवून त्याचा सत्कार केला. कार्यकर्त्याचा हा सन्मान आणि आगळावेगळा सत्कार पाहून गावकरी चकित झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA took chapples on head because of activist wish