Avinash Jadhav: 'भाजप दाखवण्यापुरता मित्र...; युतीवर मनसेचं स्पष्टीकरण' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avinash Jadhav: 'भाजप दाखवण्यापुरता मित्र...; युतीवर मनसेचं स्पष्टीकरण'

Avinash Jadhav: 'भाजप दाखवण्यापुरता मित्र...; युतीवर मनसेचं स्पष्टीकरण'

राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आधीपासूनच भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच गणेश उत्सवा दरम्यान मनसे आणि भाजपा यांच्या भेटीगाटी वाढल्यानंतर युतीबद्दलच्या चर्चानां उधाण आलं. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मनसे भाजपा युतीवरती स्पष्टीकरण दिलं आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चानां वेग आला होता. यावर स्पष्टीकरण देताना मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, “भाजपला दाखवण्यापुरते मित्र आहेत. आम्ही त्यांना फारसं महत्व देत नाही”.

आम्ही अजून कुठेही आमची युती होतेय, असं म्हटलेलं नाही. आम्ही सगळ्या जागांवर लढणार आहोत. आमचे सगळ्या पक्षात मित्र आहेत. नागपुरातून राज ठाकरेंनी येत्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ फोडला आहे, असंही अविनाश जाधव यावेळी म्हणाले आहेत.

Web Title: Mns Avinash Jadhav Talked On Bjp And Manases Alliance In Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..