मोदींच्या निर्णयानंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्र व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

राज ठाकरे यांचे जुनं व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र 9 ऑक्टोबर 2017 रोजी रेखाटले होते.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाबाबत रविवारी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र व्हायरल झाले आहे.

राज ठाकरे यांचे जुनं व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र 9 ऑक्टोबर 2017 रोजी रेखाटले होते. परतीचा पाऊस असे हेडिंग देऊन सोशल मीडियाचे हे अस्त्र बुमरँग सारख त्यांच्यावरच पुन्हा उलटून येत असल्याच्या आशयाचं हे चित्र राज ठाकरे यांनी रेखाटलं होते. मोदी आणि अमित शहा यांच्यावर हा सोशल मीडिया बुमरँग झाल्याचे दाखविले होते.

‘येत्या रविवारपासून मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवरील सर्व अकाउंट्स बंद करू इच्छितो, लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करेन,’’ असेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. डिजिटल इंडियाचा पाया रचणाऱ्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर असणाऱ्या जागतिक नेत्यांपैकी एक नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मोदींच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनीही मोदींना टोला लगावत म्हटले आहे, की सोशल मीडिया नाही...द्वेष सोडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray cartoon viral on social media after Narendra Modi decision