मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

राज ठाकरे म्हणाले, की आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. मोदी, तुम्हाला देश माफ करणार नाही.

मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दलच्या विधानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. 

मोदींनी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधींवर टीका करताना म्हटले होते, की मि. क्‍लिन यांचा अंत पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून झाला. मोदींच्या या वक्तव्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसने मोदींवर जोरदार हल्ला केला आहे. संतप्त राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना म्हटले, की तुमची कर्म वाट बघत आहेत.त्यांच्या भगिनी प्रियांका गांधींनी पुढे सरसावत मोदींवर तोफ डागली आहे. आता मोदींना राजकीय क्षितीजावर हटवा असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांनीही मोदींना लक्ष्य केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, की आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. मोदी, तुम्हाला देश माफ करणार नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief Raj Thackeray criticize Narendra Modi on Rajiv Gandhi remark