अण्णांच्या आंदोलनामुळे मोदी सत्तेत : राज ठाकरे

Raj Thackeray
Raj Thackeray

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचा वापर करून घेतला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. 

लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले आहे. अण्णांच्या उपोषणाचा आज (सोमवार) सहावा दिवस असून, अण्णांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. सरकारकडूनही अण्णांचे उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले, की हे सरकार पाडण्यासाठी अण्णा हजारे यांनी प्रयत्न करावेत. आमचा त्यांना पाठिंबा आहे. मोदी आणि केजरीवाल यांनी अण्णांचा वापर केला. मोदींसारखा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. एका रात्रीत सीबीआयच्या प्रमुखाला काढून टाकणे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय़ाधीशांनी पत्रकार परिषद घेणे, आरबीआय़च्या गर्व्हनरांना हटविणे हे योग्य नाही. हे सरकार कसे गाडता येईल, याकडे आमचे लक्ष आहे. 5 वर्षे झाली अद्याप लोकपालबाबत कारवाई नाही. माणसे वापरून फेकून देणे, एवढच यांना माहिती आहे. अण्णांमुळे मोठे झालेले केजरीवाल अण्णांना भेटायला येत नाहीत. स्वायत्त संस्थांचा वापर केला जात आहे. अण्णांनी निर्दयी सरकारसाठी जीवाची बाजू लावू नये. अण्णांनी तत्काळ उपोषण सोडावे. पंतप्रधानकार्यालयातून पत्र येणे हा निर्लज्जपणा आणि निर्ढावलेपणा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com