esakal | राज ठाकरेंनी केला काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ शेअर
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

राज ठाकरेंनी म्हटले आहे, की संत ज्ञानेश्वरांच्या रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदींनी कळसास नेल्या. त्यातील एक रचना शमीम अख्तर या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं, हा कश्मिरीयतने मराठीप्रती दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो.

राज ठाकरेंनी केला काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ शेअर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) मराठी भाषा दिनानिमित्त एका काश्मिरी तरुणीने गायलेल्या मराठी गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. कश्मिरीयतने मराठीप्रती दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आज मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्य सरकारनेही शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याचे विधेयक आणले आहे. विधिमंडळात आज एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांनी मराठी दिनानिमित्त एका काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. 'हा व्हिडिओ आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशा शुभेच्छाही राज यांनी दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

राज ठाकरेंनी म्हटले आहे, की संत ज्ञानेश्वरांच्या रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदींनी कळसास नेल्या. त्यातील एक रचना शमीम अख्तर या काश्मिरी तरुणीला काश्मिरी वाद्यसाजात गावीशी वाटणं, हा कश्मिरीयतने मराठीप्रती दाखवलेला आदर, तो वृद्धिंगत होवो, राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो.

तसे त्यांनी कवी कुसुमाग्रज यांनी अभिवादन करत म्हटले आहे, की कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.