Loksabha 2019 : माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरे

वृत्तसंस्था
रविवार, 21 एप्रिल 2019

मी जेव्हा काँग्रेसविरोधात बोलत होतो तेव्हा यांना गुदगुल्या होत होत्या. आता यांना उघडे पाडायला सुरवात केल्यानंतर त्यांना वाईट वाटत आहे. काँग्रेसविरोधात बोलताना मला भाजपने सुपारी दिली होती का? मी घेत असलेल्या सभांचा खर्च मनसे करत आहे. आमच्या खर्चाबद्दल बोलण्याचा मुख्यमंत्री किंवा इतर नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही. भाजप एवढा खर्च कोठून करते याचा हिशोब देतील का?

मुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी यापूर्वीच सांगितले होते. जे माझ्या मनात आहे, हे लोकांना सांगण्यासाठी मी सभा घेत आहे. गेल्या पाच वर्षांत लोकांनी जे भोगले ते लोकांपर्यंत पोहचविले. माझे लक्ष्य हे विधानसभा निवडणूक आहे, त्यावेळी मी माझे उमेदवार उभे करेन, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

बीबीसी मराठी या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले. भाजप-शिवसेनेला मतदान करू नका, हा माझा स्पष्ट उद्देश आहे. त्याला फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होत असेल तर होऊ द्या, असे राज यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले, ''मी जेव्हा काँग्रेसविरोधात बोलत होतो तेव्हा यांना गुदगुल्या होत होत्या. आता यांना उघडे पाडायला सुरवात केल्यानंतर त्यांना वाईट वाटत आहे. काँग्रेसविरोधात बोलताना मला भाजपने सुपारी दिली होती का? मी घेत असलेल्या सभांचा खर्च मनसे करत आहे. आमच्या खर्चाबद्दल बोलण्याचा मुख्यमंत्री किंवा इतर नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही. भाजप एवढा खर्च कोठून करते याचा हिशोब देतील का? तुम्ही मारलेल्या थापा मोजा, माझा खर्च मोजायला कशाला जाताय? मला यांच्यासारखी भाड्याने माणसे आणावी लागत नाहीत. माझा विरोध नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीला आहे. देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते जे सांगतात ते हे करतात. नोटाबंदी, जीएसटी याबद्दल यांनी आता बोलावे. सीबीआयमध्ये अधिकाऱ्यांमध्ये भांडणे होतात, न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागते, आरबीआयच्या गर्व्हनरला राजीनामा द्यावा लागतो, हे यापूर्वी ऐकले आहे का? मी गुजरात दौऱ्यावर गेल्यावरही म्हटले होते, महाराष्ट्र नंबर एकच आहे. 

Web Title: MNS chief Raj Thackeray statement about assembly election in Maharashtra