मनसेची पहिली यादी जाहीर; पुण्यातून चौघांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

दोन ऑक्‍टोबरपासून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील. तसेच, येत्या 5 ऑक्‍टोबरपासून राज ठाकरे हे प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिली यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात पुण्यातून कसबा मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, कोथरूडमध्ये किशोर शिंदे, हडपसरमधून वसंत मोरे आणि शिवाजीनगर मतदारसंघातून सुहास निम्हण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. त्यानंतर आज सायंकाळी 27 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मनसेने पुण्यातून आठही जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या यादीमध्ये चार जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. वसंत मोरे हे विद्यमान नगरसेवक असून, किशोर शिंदे हे माजी नगरसेवक आहेत. तर, सुहास निम्हण हे शिवाजीनगर मतदारसंघाचे मनसेचे विभागीय अध्यक्ष आहेत.

Vidhan Sabha 2019 : यड्रावकरांना उमेदवारीबाबत विश्‍वास; म्हणाले...

दोन ऑक्‍टोबरपासून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील. तसेच, येत्या 5 ऑक्‍टोबरपासून राज ठाकरे हे प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Vidhan Sabha 2019:भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Declared their Candidates List for Maharashtra Vidhan Sabha 2019