राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या 'ईडी'ला मनसेकडून 'नोटीस'

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अनेकांना चौकशीच्या नोटीसा पाठविणारे सक्‍तवसुली संचालनालय अर्थात 'ईडी' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगळीवेगळी नोटीस पाठविल्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. 

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अनेकांना चौकशीच्या नोटीसा पाठविणारे सक्‍तवसुली संचालनालय अर्थात 'ईडी' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगळीवेगळी नोटीस पाठविल्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. 

कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना "ईडी ने (सक्तवसुली संचालनालय) नोटीस बजावल्यानंतर काल गुरूवारी त्यांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली होती. आता यानंतर मनसेने "ईडी'ला नोटीस पाठवली आहे. "ईडी' च्या कार्यालयाबाहेरील फलक मराठी भाषेत नसल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली असल्याचे मनसेने म्हटले आहे. महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, ही बाब "ईडी' चे कार्यालय बहुदा विसरलेले दिसते, पण आम्ही ह्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ह्या नोटिशीची प्रत "ईडी'ला पाठवण्यात आली आहे.

मराठी भाषा विभाग "ईडी' ला मराठी फलकाची सक्ती करणार का? असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS gives Notice to ED for Marathi Plate Issue