'कैसे कैसों को दिया है'; अदनान सामीला 'पद्म' दिल्याने मनसेचा विरोध!

टीम ई-सकाळ
Sunday, 26 January 2020

यंदा 141 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, काहींना संयुक्तपणे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. सात जणांना पद्मविभूषण, सोळा जणांना पद्मभूषण आणि 118 जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले.

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता.25) सायंकाळी केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मात्र, मूळ पाकिस्तानी गायक असलेल्या अदनान सामीला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार विरोध केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाकिस्तानी गायक अदनान सामी मूळ भारतीय नाही. त्यामुळे त्यांना देण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्याची मागणी मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे. याबाबतची भूमिका त्यांनी ट्विटरवरून जाहीर केली.

खोपकर म्हणाले की, ''अदनान सामी मूळ भारतीय नागरिक नसल्याने भारत सरकारने त्यांना कोणताही पुरस्कार देऊ नये.'' या मतावर मनसे ठाम असून सामींना पद्म पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत निषेध दर्शविला. आणि पुरस्कार रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. 

- सुरेश वाडकरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे

दरम्यान, अदनान सामी हे अधूनमधून पाकिस्तानविरोधात ट्विटरद्वारे आपले मतप्रदर्शन करताना दिसतात. ते गेल्या काही वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहेत. तसेच 2015 मध्ये त्यांना कायमस्वरुपी भारतीय नागरिकत्व देण्यात आले असून त्यानंतर चार वर्षांच्या काळातच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. 

- 'तानाजी'च्या टीमने सिंहगड संवर्धनाची जबाबदारी घ्यावी : मानकर

तत्पूर्वी, कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना "पद्म' पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

- मोदी, शहांना विरोध केल्यास तुम्ही शहरी नक्षलवादी : राहुल गांधी

यंदा 141 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, काहींना संयुक्तपणे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. सात जणांना पद्मविभूषण, सोळा जणांना पद्मभूषण आणि 118 जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये 34 महिलांचाही समावेश आहे. बारा जणांना मरणोत्तर हे पुरस्कार प्रदान केले जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS has opposed Padma Shri to Pakistani born Adnan Sami