Sushma Andhare : “या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत....अंधारेबद्दल बोलताना जेष्ठ नेत्याची जीभ घसरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare : “या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत....अंधारेबद्दल बोलताना जेष्ठ नेत्याची जीभ घसरली

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे चांगल्याच चर्चेत आहेत. त्या गेल्या काही दिवसांपासून प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून त्या नेत्यांवर टीका करताना दिसून येतात. यावेळी त्यांच्यावर टीका करताना जेष्ठ नेत्याची जीभ घसरली आहे. सुषमा अंधारे जशी शिवसेनेत आली, तशा शिवसेनेच्या उजेडातल्या बायका अंधारात गेल्या असं म्हणत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेतील जुन्या नेत्यांवर अन्याय झाला असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. ज्या 85 वर्षांच्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी कोणत्याही मर्यादा पाळल्या नव्हत्या. त्यांच्यावर टीका करताना बाळासाहेबांना अंधारेंनी म्हाताऱ्या हा शब्द त्यांनी उच्चारला होता त्याच सुषमा अंधारे यांचे भाषण आता जुन्या शिवसैनिकांना ऐकावे लागत असल्याची खोचक टीका महाजन यांनी केली आहे.

प्रकाश महाजन बोलताना म्हणाले की, सुषमा अंधारे मागील काही वर्षे हिंदू धर्मावर टीका करत होत्या. त्यावेळी त्यांनी संत एकनाथ महाराज यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी त्यांनी संत ज्ञानेश्वरांवरही टीका केली होती. तर या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असले तर आम्ही काय करणार असं म्हणत असाताना महाजन यांनी अंधारेंचा उल्लेख म्हैस असा केला आहे. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मनसेच्या ज्येष्ठ नेत्याने सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत असताना जीभ घसरल्यामुळे प्रकाश महाजन यांच्यावर टीका होऊ लागली याहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रकाश महाजन आणि सुषमा अंधारे यांचा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Shiv Senamns