'उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही'

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करणारे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसैनिकांनी 420 चा म्हणजे फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला हरकत नाही, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगाविला आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. आगामी लोकसभा व विधानसभेत दोन्ही पक्ष युतीनेच लढणार असल्याचे जाहीर केले. यानंतर स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेसने शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचे म्हटले आहे. तर, आता मनसे नेत्यांनीही शिवसेनेवर वार केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही तो न्यायालयात सुद्दा टिकेल, असे मला मूळचा शिवसैनिक असलेला वकील सांगत होता. अफझल खानाच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने शरयू आणि चंद्रभागेच्या स्नानामुळे युती मीठी नदीकाठी पवित्र झाली आता पहिले सरकार फिर मंदिर जय श्रीराम #लाचारसेना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com