"88 MLA" आमदारकीची नंबरप्लेट बघून तात्यांना मोह आवरेना: Vasant More News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant More News

Vasant More: "88 MLA" आमदारकीची नंबरप्लेट बघून तात्यांना मोह आवरेना

Vasant More News: शहरातील समस्या, नागिरकांचे प्रश्न, विकासकामातील अडथळ्यांबरोबर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर समाजमाध्यमातून सातत्याने आवाज उठविणारे मनसे नेते वसंत मोरे नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत आहेत.

आता ते आमदारकीची स्वप्न पाहत आहे. त्यांची नवी फेसबुक पोस्ट पाहून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.(mns leader vasant more shared facebook post about australian numberplate 88 mla goes viral)

नुकतंच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियामधील सिडनीयेथील गाड्या दिसत आहेत. विशेष म्हणजे या गाड्यांच्या नंबर प्लेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यावर 88 MLA असा उल्लेख केला आहे. सिडनीमधील गाडीचा फोटो मोरे यांच्या मामाच्या मुलाने पाठवला आहे.

Bacchu Kadu: अखेर मनातलं ओठावर; 'मुख्यमंत्री बनायचंय' बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा

नेमकी काय आहे फेसबुक पोस्ट?

आपल्या देशात अश्या नंबरप्लेटची सुविधा नाय ना राव नाही तर एखादी आपण पण घेतली असती. असे मी माझ्या मामाच्या मुलाला बोललो. ज्याने मला हा फोटो ऑस्ट्रेलिया सिडनी येथून त्याच्या प्रवासादरम्यान काढून मला पाठवला.

मोरेंची ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मोरे आमदारकीचं स्वप्न पाहत आहेत, अशा चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेंची ओळख. राज ठाकरेंच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेंचं नाव अग्रस्थानी येतं. वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते राज ठाकरेंप्रमाणेच आधीचे शिवसैनिक आहेत. गेली 27 वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

Ramdas Kadam: 'माझ्या नादाला लागू नका', ठाकरेंच्या सभेनंतर रामदास कदम संतापले

तर 2006 साली मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज यांची साथ न सोडता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. वर्षभरातच म्हणजेच, 2007 साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं एकाच फटक्यात 8 नगरसेवक निवडून आणले. मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता.

तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

2012च्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेनं थेट 27 नगरसेवक निवडून आणले आणि वसंत मोरेदेखील पुन्हा जिंकले. दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.

पण तिथं मात्र यश त्यांच्या हाती लागलं नाही. ते पुन्हा 2017 साली नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले. इतकंच नाही तर 2012 ते 2013 दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेतेपद देखील भूषवलं. 2021 दरम्यान त्यांना राज ठाकरेंनी पुण्याचं शहराध्यक्ष पद दिलं होतं.

टॅग्स :Vasant More