
Sandeep Deshpande: "तुम्ही आता पंतप्रधान होणार! मज्जा आहे बाबा एका...", संदीप देशपांडेंच ट्विट चर्चेत
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतात. अनेक नेते आरोप प्रत्यारोप करतात. अशातच काल ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देशात नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असं वक्तव्य केलं आहे. कायम आरोप प्रत्यारोप करणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगावला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंबधीचं ट्विट केलं आहे. सध्या ते ट्विट व्हायरल होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता संदीप देशपांडे यांनी हे ट्विट केलं आहे. देशाच्या भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.. भंकस वाटली असेल तर मला माफ करा, अशा खोचक शब्दात संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.
संदीप देशपांडे यांचं ट्विट?
"भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना मानो होली है “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची…." असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
२०२४ मध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? यावर संजय राऊत म्हणाले होते की , यावर आता भाकित करण सोप नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडी असताना सर्वांनी ठरवलं होत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तर एकत्र येऊ आणि सरकार बनवू. त्यानंतर सरकार बनले.
उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेक विरोधी पक्षांना वाटतं की त्यांनी विरोधी पक्षांचं नेतृत्व करावं. त्यामुळे सध्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसेच देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांचंच नेतृत्व प्रभावी असल्याचं वक्तव्यही राऊत यांनी याआधी केलं आहे.