MNS Padwa Melava: "धन्य ते हास्यसम्राट" म्हणत राज ठाकरेंच्या मेळाव्यावर राष्ट्रवादीची जोरदार टीका

MNS Padwa Melava
MNS Padwa Melavaesakal

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राजकारणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. राजकारणाचा खेळ झाला आहे. हे सर्व पाहताना मला वाईट वाटलं.

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं. हे तुझं का माझं हे चालू होत. तेव्हा वेदना होत होत्या तो पक्ष मी जगलो आहो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांवर देखील तोफ डागली. मात्र मनसेच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे.

MNS Padwa Melava
MNS Padwa Melava: 'पेंग्विन' हा एकच शब्द बोलून राज ठाकरेंनी अधिक भाष्य करणे टाळले

राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा.. महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जुन ला "रायगड" जाणार असं समजल, पण हे महाशय गड चढुन जाण्याची हिम्मत करतील का? कसं आहे ,गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे" त्यामुळे आता मनसेकडून देखील प्रतिउत्तर दिल जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

MNS Padwa Melava
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम दर्ग्यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांचे महत्वाचे आदेश

तसेच राज ठाकरे यांनी जुना एक किस्सा सांगितला ते म्हणाले आपण शिवसेनेत असतांना नेहमीच्या जाचाला वैतागून काय तो सोक्षमोक्ष लावायचं ठरवलं... असं म्हणून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत शेवटची चर्चा झाल्याचं नमूद केलं.

राज ठाकरे म्हणाले की, एके दिवशी उद्धवला म्हणालो, चल बाहेर जायचं आहे. हॉटेल ओबेरॉयला आम्ही गेलो. शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, खोटं नाही बोलत. मी उद्धवला म्हणालो- बोल तुला काय हवंय? पक्षाचा प्रमुख व्हायचंय तर हो, सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय- हो. परंतु मला माझं काम काय ते सांग? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com