"मनसे'ची टाळी नाकारली 

mns
mns

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची 25 वर्षांची युती धाडसाने तोडलेली असताना मनसे युतीसाठी आतुर झाली आहे. शिवसेनेसोबत एकत्र येण्याची मनसेची इच्छा आहे. राज ठाकरे यांनी उद्धव यांना त्यासाठी सात वेळा दूरध्वनी केल्याचा दावा मनसेचे बाळा नांदगावकर यांनी सोमवारी (ता. 30) केला; मात्र आता कोणासोबतही युती करणार नाही. राज्यभरात शिवसेना स्वबळावरच भगवा फडवण्यासाठी संपूर्ण ताकदीने उतरली आहे, असे जाहीर करत उद्धव यांनी "एकला चलो रे'चा नारा पुन्हा दिला. 

आतापर्यंत शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर मनसे नेते राज ठाकरे यांनी सातत्याने टीका केली आहे. मात्र भाजपसोबत युती तुटल्यानंतर मनसेला शिवसेनेसोबत युती करायची इच्छा आहे. युतीचा हा एकतर्फी निर्णय मनसेने घेत बाळा नांदगावकर यांच्यामार्फत "मातोश्री'वर पोहचवला. मात्र उद्धव भेटले नाहीत, असा दावा नांदगावकर यांनी केला. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही, असा खुलासा उद्धव यांनी केला आहे. 

युती व आघाडीने मुंबईत "सवतासुभा' मांडलेला असताना मनसेच्या राजकीय खेळीची चर्चा रंगली आहे. भाजप नेत्यांनी मात्र शिवसेनेवर कठोर हल्लाबोल करत पारदर्शकेतेचा अजेंडा प्रचाराचा मुद्दा केला आहे; तर शिवसेना आमदार अनिल परब यांनी भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेतील गैरव्यवहाराची प्रकरणे पत्रकार परिषदेत मांडत प्रत्युत्तर दिले आहे. 

आघाडीसाठी चर्चा 
कॉंग्रेस व राष्ट्रवादीत मात्र मुंबईवगळता राज्यातील इतर महापालिका व जिल्हा परिषदांसाठी आघाडीची चर्चा सुरू आहे. आज मुंबईत कॉंग्रेसच्या नेत्यांची याबाबत बैठक झाली. राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेण्याची तयारी दाखवली. जागावाटपाबाबतही चर्चा सुरू करण्याचे ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com