शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी: राज ठाकरे

raj thackeray
raj thackeray

मुंबईः लोकांच्या सुख-दु:खाशी शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही. पैशाची कामे अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामे झाली की सत्तेत राहते. शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) केली.

राज ठाकरे म्हणाले, 'आजचा बंद कुणी पुकारला, हे महत्वाचं नाही, पेट्रोल-डिझेल हा विषय महत्वाचा आहे. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आज उत्तम आंदोलन केले असून, त्यांचे अभिनंदन. सरकारवरील नागरिकांचा रोष महाराष्ट्रभर दिसून आला. ज्या प्रकारचे राजकारण भाजप खेळतंय, हे त्यांच्याही अंगलट येईल. शिवसेनेला तर स्वत:ची भूमिका नाही, त्यामुळे त्यांना भाव देण्यात काही अर्थ नाही. पैशाची कामं अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामे झाली की सत्तेत राहते. शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी आहे. लोकांच्या सुख-दु:खाशी शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही'

हे (भाजप) काँग्रेसपेक्षा वाईट आहेत, खास करुन दोन माणसं, म्हणजे मोदी आणि शाह. नोटाबंदी, जीएसटी फसल्याने लोकांच्या खिशात हात घातला आहे. देशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा, असेही ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे-

  • माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलन केले, त्यांचे अभिनंदन.
  • आजचा बंद कुणी पुकारला, हे महत्वाचं नाही, पेट्रोल-डिझेल हा विषय महत्वाचा आहे.
  • लोकांचा रोष महाराष्ट्रभर दिसून आला.
  • लोकांच्या सुख-दु:खाशी शिवसेनेला काहीही घेणे-देणे नाही
  • हे (भाजप) काँग्रेसपेक्षा वाईट आहेत, खास करुन दोन माणसं, म्हणजे मोदी आणि शाह.
  • नोटाबंदी, जीएसटी फसल्याने लोकांच्या खिशात हात.
  • देशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा.
  • शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी.
  • पैशाची कामे अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामे झाली की सत्तेत राहते.
  • शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही, त्यामुळे त्यांना भाव देण्यात काही अर्थ नाही.
  • परिणाम दिसायला बाहेर यावे लागते.
  • ज्या प्रकारचं राजकारण भाजप खेळतंय, हे त्यांच्याही अंगलट येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com