मी घाबरणार नाही... हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंनी दिला इशारा: Sandeep Deshpande | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Deshpande

Sandeep Deshpande : मी घाबरणार नाही... हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंनी दिला इशारा

मी घाबरणार नाही आणि मला कुणी घाबरवण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रुग्णलयातून डिस्चार्ज मिळताच दिला आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्नीग वॉक दरम्यान ४ जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. काही तासांभरानंतर त्यांच्यांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Sandeep Deshpande : राज ठाकरे आले, संदीप देशपांडेंना आपली गाडी दिली अन्..

डिस्चार्ज दिल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतःच्या गाडीतून देशपांडे यांना घरी पाठवले. दरम्यान यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

मी कुणाला घाबरत नाही. त्यांना वाटतंय मी घाबरेन. पण आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही कुणाला भीक घालत नाही. कुणी घाबरवण्याचा प्रयत्न करु नये. तसेच, या हल्ल्यामागे कोणं आहे हे सर्वांना माहिती आहे. अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी व्यक्त केली.

Live Update: सर्वसामान्यांचे सरकार असल्यावर हे असच होणार; देशपांडेंवरील हल्लानंतर अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया

नेमकं काय घडलं?

मनसे नेते संदीप देशपांडे हे आज पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी अचानक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला चढवला. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे.

Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला

मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे यांच्यावर ४ जणांनी स्टंपने हल्ला चढवला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या डोक्याला तसेच पायाला दुखापत झाली. दरम्यान, देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

टॅग्स :Sandeep Deshpande