बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद, मनसेच्या नेत्याचा संभाजी ब्रिगेडवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare

पुरंदरेंच्या अस्थीविसर्जनावरून नवा वाद, मनसेचा संभाजी ब्रिगेडवर हल्लाबोल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : बाबासाहेब पुरंदरेंच्या (Babasaheb Purandare) अस्थीविसर्जनावरून नवा वाद उफाळून आला आहे. ११ किल्ल्यांवर बाबासाहेबांच्या अस्थी विसर्जित केल्या जातील, असं सांगितलं होतं. त्याला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला होता. मात्र, त्यानंतर असं काहीही प्रस्तावित नाही, असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले. पण, आता मनसेचे (MNS) पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडवर (Sambhaji Brigade) हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा: मुलाखतींतून उलगडलेले बाबासाहेब

''काही नालायकांना आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची इतकी काळजी वाटते, तर कितीतरी दारूचे दुकानं, परमिट रुम, लॉजला महाराजांनी कष्टानं मिळविलेल्या गडांची नाव दिली आहेत. तिकडे तुमचे मरदुमकी दाखवा. राजगड आमच्या ऑफिसचं नाव आहे. पवित्र-अपवित्र ठरविण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला'', असा सवाल उपस्थित करत मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडवर हल्ला चढवला. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिले आहे.

वसंत मोरे यांना संभाजी ब्रिगडेचे संतोष शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिले. ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्या माणसाने आयुष्यभर जोगवा मागितला त्याने महाराजांचा ३० टक्के इतिहास खोटा सांगितला. शिवाजी महाराज आणि जिजाऊंचं चारीत्र हनन केलं. त्याला आम्ही वेळोवेळी विरोध केला. गडावर अस्थीविसर्जन करण्याच्या बातम्या पसरविणे हे घाणेरडे राजकारण आहे. शिवप्रेमी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांगल्या विचारांचा जागर करा. बहुजनांच्या पोरांची माथी भडकण्यासाठी गडावर अस्थीविर्जन करू देणार नाही. आमचे किल्ले, गड आम्ही अपवित्र करणार नाही, असं संतोष शिंदे म्हणाले.

नेमका काय आहे वाद? -

बाबासाहेब पुरंदरे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन ११ किल्ल्यांवर करणार असल्याचे सांगण्यात येत होते. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनाही या अस्थी राजगडावर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याला संभाजी ब्रिगडेने तीव्र विरोध दर्शविला. मात्र, त्यानंतर राजगड म्हणजे आमचं कार्यालय आहे. आम्ही कुठल्याही गडकिल्ल्यावर अस्थी नेणार नाही, असं स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे.

loading image
go to top