मादळे येथे एकाच्या घरावर जमावाचा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

नागाव - मादळे (ता. करवीर) येथील संतप्त महिलांनी अशोक बिडकर यांच्या घरावर हल्ला केला. खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच मोटारसायकलवरही दगडफेक करून नुकसान केले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस मादळेत पोहोचले. संबंधितांना ताब्यात घेऊन, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून पोलिसांच्या पुढाकारानेच हा वाद पोलिस ठाण्यातच मिटविला. 

3 जुलै 2016 ला अशोक बिडकर यांच्या मालवाहतूक टेम्पोतून इचलकरंजी येथील नातेवाइकांच्या रक्षाविसर्जनासाठी मादळेच्या तीस महिला व पुरुष गेले होते. परत येताना या मालवाहतूक टेम्पोचा अपघात होऊन यातील बाराजणांचा मृत्यू झाला होता, तर उर्वरित अठरापैकी काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे मादळेतील अनेकांच्या मनामध्ये अशोक बिडकर यांच्याबद्दल खदखद होती. आज गावातील शहाजी सातारे (वय 65) यांचा मृत्यू झाला. या वेळी अशोक बिडकर यांच्या भावजय छाया बाजीराव बिडकर या सातारे यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती अनिता पोवार व छाया बिडकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसान नंतर बिडकर यांच्या घरावरील हल्ल्यात झाले. महिलांच्या संतप्त जमावाने बिडकर यांच्या घरावर दगडफेक केली. त्या वेळी अशोक बिडकर यांचे चुलत भाऊ आनंदा बिडकर तेथे आले. ते मध्ये पडताच काही युवकांनी त्यांना बाजूला करत त्यांच्या मोटारसायकलवर दगडफेक केली. याबाबत आनंदा बिडकर यांनी शिरोली पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत कारवाईची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांनी सामोपचाराने या वादावर पडदा टाकला. 

Web Title: A mob attacked the house