राज्याच्या राजधानीत ‘मॉब लिंचिंग’ची घटना

Crime
Crime

मुंबई - चोरीच्या संशयावरून अनोळखी तरुणाला टोळक्‍याने केलेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. राज्याच्या राजधानीत हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. 

येथील ग्रॅंट रोड स्थानकाशेजारी पाच दिवसांपूर्वी अनोळखी तरुण जखमी अवस्थेत सापडला होता. त्याला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले होते. मृत तरुणाच्या खांद्यावर, पायाच्या मांडीवर, तसेच गुप्तांगाच्या ठिकाणीही मारहाणीचे व्रण असल्यामुळे जमावाकडून मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीतील व्यक्तींची आणि घटनांची माहिती घेण्यास सुरवात केली. त्या वेळी, मालाची चोरी केल्याच्या संशयावरून सनी खारवा व त्याच्या दोन साथीदारांनी संबंधित तरुणाला बांबू व लाथा-बुक्‍यांनी बेदम मारल्याचे समजले.

त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. चौकशीत विकी पवार (वय २०) व ज्ञानेश्‍वर पवार (वय २५) यांचाही हत्येत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही अटक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com