दहा शहरांत आता मोबाईल एटीएम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीनंतर नागरिकांची सुरू असलेली आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी मुंबईसह दहा शहरांत "मोबाईल एटीएम'चा पर्याय शोधण्यात आला आहे. ओला कॅब आणि येस बॅंक यांनी सोमवारपासून (ता. 5) "ओला कॅश ऑन व्हिल' ही नावीन्यपूर्ण सुविधा सुरू केली आहे.

दिवसापोटी दोन हजार काढण्याची सुविधा नागरिकांना त्यांच्या परिसरात मिळणार आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, पुणे, कोलकाता, चंडीगड, अहमदाबाद, हैदराबाद आणि जयपूर या शहरांत ही सेवा मिळेल. प्रत्येक शहरातील मोक्‍याच्या ठिकाणी हे मोबाईल एटीएम ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. मुंबईत अंधेरी, सांताक्रूझ, वरळी, वाशी, जुहू, प्रभादेवी आदी ठिकाणी ही सेवा मिळणार आहे.

Web Title: mobile atm in ten cities