''महाराष्ट्रद्रोही मोदी परत जा'', पंतप्रधानांच्या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

Congress NCP Opposed PM Modi Pune Visit
Congress NCP Opposed PM Modi Pune Visit sakal

पुणे : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर (PM Modi Pune Visit) आहेत. ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत. मात्र, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दोन्ही पक्षाकडून मोदींचा विरोध केला जात आहे. काँग्रेसकडून 'महाराष्ट्रद्रोही मोदी परत जा' असे बॅनर लावण्यात आले आहे. अलका चौकात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.

Congress NCP Opposed PM Modi Pune Visit
पुणेकर PM मोदींना देणार मानाचा फेटा; ऑस्ट्रेलियन डायमंड, सोन्याचा वापर

काँग्रेसचं अलका चौकात आंदोलन -

काँग्रेस ने तिकीट काढून देत महाराष्ट्रातून कोरोना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पोहोचवला असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसकडून मोदींविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं. तसेच पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती. आज याच मागणीसाठी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध केला जात आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते अलका चौकात आंदोलन करत असून ''महाराष्ट्रद्रोही मोदी परत जा'' अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधानांना काळे झेंडे देखील दाखवण्यात येणार आहे. याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं असून पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गात कार्यकर्ते अडथळा आणणार नाहीत याची काळजी पोलिस घेत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच जनतेचे रक्षण हाच आपला धर्म मानला आहे. मोदी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये देशांच्या मुलांना मृत्यूच्या दारात सोडून पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. यामुळे पुणे शहर मोदींचे स्वागत #GoBackModi ने करत आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींकडून पुणे मेट्रोचं उद्घाटन हा केवळ देखावा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मोदींच्या दौऱ्याला राष्ट्रवादीचा विरोध
मोदींच्या दौऱ्याला राष्ट्रवादीचा विरोध e sakal

मोदींच्या दौऱ्याला राष्ट्रवादीचा विरोध -

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला काँग्रेससोबतच राष्ट्रवादीनं विरोध केला आहे. आंबेडकर पुतळा परिसरात राष्ट्रवादीचं मूक आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्राची बदनामी केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com