सरकार येणार नाही हे मोदींनाही कळलंय : राज ठाकरे

Modi knows that government will not come: Raj Thackeray
Modi knows that government will not come: Raj Thackeray

परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला नसून मराठवाडा हा खड्यात आहे. या भागातून मोठे नेते होऊन गेले मात्र आजच्या घडीला ही मराठवाड्याची दुरावस्था झाली असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे हे पक्ष बांधणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, ते आज परभणीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास परभणी येथे दाखल झाल्यांनतर जिल्हयातील सेलू तालुक्यात कार्यकर्त्यांची धावती भेट घेऊन परभणी येथे दुपारी सावली विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर ठाकरेंनी टीका केली. 

मराठा आरक्षणावर बोलतांना ठाकरे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्र्यांना नागपूर शिवाय दुसरा काही दिसत नाही. विदर्भ आणि महाराष्ट्राला दूर करण्याचा कट कारस्थान मुख्यमंत्र्याचेच आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पीक विम्यावर प्रश्न विचारले असता सरकारला फक्त योग करण्याशिवाय दुसरे काम नाही, एकीकडं मुंबईत ब्रिज पडतात, रेल्वेत सुविधा नाही आणि अशा परिस्थितीत बुलेट ट्रेन आणतायेत, असे असताना या सरकारचे पीक विम्यावर कधी लक्ष जाणार.

महाराष्ट्रात होत असललेल्या शेतकरी आत्महत्या दुर्दैवी असून या सरकारकडून कसली अपेक्षा नाही. मला जसे राजकारण समजते तेव्हापासून आजपर्यंतचे हे खोटे सरकार आहे. केवळ खोटे नसून महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. मागील तीस वर्षात सर्वात जास्त संख्याबळ असलेले हे सरकार असूनही त्यांच्याकडून विकास होत नाही. नाणार प्रकल्पाला सर्वात प्रथम मी विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना करत आहे. 

राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवर बोलतांना ठाकरे म्हणाले, मोदी विदेशात जाऊन मिठ्या मारतात तर राहुल गांधींनी मिठी मारली यात त्यांच काय चुकलं. पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे बीड जिल्ह्याकडे रवाना झाले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com