Mohit Kamboj News : वाढदिवसादिवशी CM शिंदेंनी मोहित कंबोजांना दिले गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohit Kamboj News

Mohit Kamboj: वाढदिवसादिवशी CM शिंदेंनी मोहित कंबोजांना दिले गिफ्ट

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांना मोठा दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी कंबोज यांना देण्यात आली आहे. (Mohit Kamboj Eknath Shinde santacruz permission )

कंबोज यांच्या सांताक्रुझमधील चार फ्लॅटमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मंजूर आराखड्यानुसार, बांधकाम नसल्यानं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं कंबोज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देत कंबोज यांना दिलासा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांना पालिकेनं नोटीस पाठवली होती. त्यानंतर कंबोज यांच्या घरी मुंबई महापालिकेचं एक पथक दाखल झालं होतं.

सांताक्रूझ येथे ज्या इमारतीत कंबोज यांचं निवासस्थान आहे, त्या इमारतीची पालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्यात आली होती. कंबोज यांच्या घरात पालिका पथक दाखल झालं होतं.