मोहित कंबोज यांना अटकपूर्व जामीन मंजूर; मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

Mohit Kamboj
Mohit KambojTeam eSakal

मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी (ता. १) मुंबईत मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या कंपनीने तब्बल ५२ कोटींचे कर्ज बुजवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत मोहित कंबोज यांना अटकपूर्व जामीन (bail) मंजूर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Mohit Kamboj granted pre-arrest bail)

मागील काही दिवसांपासून मोहित कुंबोज (Mohit Kamboj) यांचे नाव चर्चेत आहे. २०११ ते २०१५ या कालावधीत मोहित कंबोज यांच्या कंपनीने इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु, हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आले. नंतरच्या काळात मोहित कंबोज यांच्या कंपनीने हे कर्ज बुडवले होते. त्यामुळे मोहित कंबोज आणि दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohit Kamboj
हार्दिक पटेलवर काँग्रेसचा गंभीर आरोप; आम्ही सन्मान दिला तर...

काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. कर्ज बुडवल्याप्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाने मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना अटकपूर्व जामीन (bail) मंजूर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com