अडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची गुरूवारी (ता. 13) शिक्षा सुनावली. 

नांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची गुरूवारी (ता. 13) शिक्षा सुनावली. 

अर्धापूर तालुक्यातील लोणी (खु) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी 2 जून २०१६ रोजी दुपारी टीव्ही पाहत होती. यावेळी तिच्या घरी दुसरे कोणीही नसल्याची संधी साधून पाणी पिण्याच्या बहाण्याने याच गावातील बापूराव उर्फ बाळु बाबूराव लोणे (वय २३) हा घरात घुसला. घरात कोणीच नसल्याचे पाहून त्याने मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने त्याला विरोध करताच तिला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला. लगेच पालकांनी तिला सोबत घेऊन अर्धापूर पोलिस ठाणे गाठले.

पीडितेच्या फिर्यादीवरुन विनयभंग, पॉस्को आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली. या प्रकरणाचा तपास फौजदार गणेश गायके यांनी केला व न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात आठ साक्षीदार तपासलेे. पीडित मुलीची साक्ष आणि उपलब्ध पुरावे आणि सरकारी वकिल यादव तळेगावकर यांनी लावून धरेलेली पीडितेची बाजू भक्कम समजून न्यायाधीश के. एन. गौत्तम यांनी वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा दिली.

यामध्ये विनयभंगप्रकरणी तीन वर्ष सक्तमजुरी व दोन हजारांचा दंड आणि घरात जबरीने घुसणे या सदराखाली एक वर्ष सक्तमजुरी व एक हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली. पॉक्सोअंतर्गत आरोपीची सुटका झाली. सर्व शिक्षा त्याला एकत्र भोगायच्या आहेत. तसेच दंडाची रक्कम पीडित युवतीला देण्याचे आदेशही दिले. मात्र, आरोपीच्या वकिलांनी त्याला जामिन मिळावा म्हणून अर्ज सादर केल्याने त्याला लगेच न्यायालयाने जामीन दिला. 

Web Title: Molestation two and a half years ago Today Punishment immediately bail