चलार्थपत्र मुद्रणालयात शाईची टंचाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नाशिक- चलनटंचाईवर मात करण्यासाठी नोटांचे उत्पादन वाढविण्यासाठी देशातील नोट प्रेसची कसोटी सुरू आहे; मात्र दुसरीकडे नोटांच्या छपाईसाठी मुद्रणालयांत पुरेशी शाई नाही. शाईच्या टंचाईविषयी स्थानिक कामगार संघटनेने हा प्रकार खासदार हेमंत गोडसे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे शाईवरून शिवसेनेकडून भाजपला घेरण्याची चिन्हे आहेत.

नाशिक रोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयासह वित्त मंत्रालयाच्या मुद्रणालयातून सध्या २० रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंतच्या नोटांचा पुरवठा सुरू आहे. दिवसाला पन्नास ते साठ लाखांच्या आसपास नोटांचा पुरवठा करणाऱ्या या मुद्रणालयांची आता कुरकुर सुरू झाली आहे. नोटांचा पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या मुद्रणालयांकडून कच्चा माल तुटवड्याचा सूर आळविला जाऊ लागला आहे. नाशिक रोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयात पुरेशी शाई नाही. दर तीन दिवसांनी शाई येते. त्यामुळे कामावर थेट परिणाम झाला नसला नाही; पण असलेली शाई पुरेशी नाही. नोटांची मागणी वाढल्याने यंत्रांवर कामाचा ताण वाढला आहे.

पावणेचार कोटी रवाना

चलार्थपत्र मुद्रणालयात सुमारे ४ कोटी ७० लाखांच्या नोटा रवाना झाल्याचे समजते. त्यात ५०० रुपयांच्या एक कोटी नोटा रवाना यापूर्वीच रवाना झाल्या. याशिवाय ५०० च्या ९० लाख, १०० रुपयांच्या १ कोटी २० लाख, तर २० रुपयांच्या १ कोटी ६० लाख याप्रमाणे साधारण ४ कोटी ७० लाख नोटांच्या छपाईचे नियोजन झाल्याचे समजते.

खासगी कंपन्या तयारीत

देशातील नोटटंचाईवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर खासगी नोट उत्पादक कंपन्याही लक्ष ठेवून आहे. देशात रिझर्व्ह बॅंकेचे सालबोनी, म्हैसूर येथे मुद्रणालय आहे. तसेच वित्त मंत्रालयाच्या चलन नाणे निधी विभागाच्या सिक्‍युरिटी प्रेस मिंट कॉर्पोरेशनचे देवास, नाशिक रोडला मुद्रणालय आहे. याशिवाय नोट उत्पादनाचा अनुभव असलेल्या काही खासगी मुद्रण संस्थाही आहेत. यापूर्वी २००३ मध्ये देशाचे चलन छापून दिल्याचा अनुभव असलेल्या काही खासगी कंपन्या सध्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Money shortage letter printing ink