ब्लॅक मनीबाबत सरकार आणखी गंभीर हवे - रामदेवबाबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

नागपूर - काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने काही परिणामकारक पावले उचलली आहे. मात्र, हा मुद्दा खूपच संवेदनशील असून त्यात आणखी गंभीर होण्याची गरज योगगुरू रामदेवबाबा यांनी आज नागपुरात व्यक्त केली. त्यांनी मोदी सरकारची कामगिरी चांगली असल्याची पावती देत दोष बघणे बंद केल्याचेही नमूद केले. 

 

नागपूर - काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने काही परिणामकारक पावले उचलली आहे. मात्र, हा मुद्दा खूपच संवेदनशील असून त्यात आणखी गंभीर होण्याची गरज योगगुरू रामदेवबाबा यांनी आज नागपुरात व्यक्त केली. त्यांनी मोदी सरकारची कामगिरी चांगली असल्याची पावती देत दोष बघणे बंद केल्याचेही नमूद केले. 

 

टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे पंचशील चौकातील पत्रकार भवनात आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी रामदेवबाबा यांनी पतंजलीचे  उत्पादन, कंपनीचा विस्तार, विदर्भाला होणारा लाभ आदीबाबत सविस्तर माहिती देत त्यांनी सरकारची सद्यःस्थिती तसेच विरोधकांवर चर्चा केली. देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा असो की चांगले धोरण आखून त्याची अंमलबजावणी असो तसेच जगात भारताची मान उंचावण्याची जबाबदारी केंद्र सरकार यशस्वीरीत्या पार पाडत असल्याचे नमूद करीत ते म्हणाले, देशातील विरोधी पक्ष दुबळा असेल तर लोकशाहीही दुबळी होते. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या विकास, हिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे एकदा म्हणालो होतो, अशीही आठवण त्यांनी करून दिली. गेल्या तीन वर्षांत पतंजलीची वाढ झाल्याची ओरड विरोधकांकडून होते. गेल्या २० वर्षांत मी लोकांचा विश्‍वास जिंकून आधार तयार केला. कंपनीची कामे पारदर्शी असून एका पैशाच्याही नफ्याची अपेक्षा न ठेवणारी संस्था आहे. कंपनीचे उत्तराधिकारीही व्यावसायिक राहणार नसून ते योगी राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधक मल्टिनॅशनल कंपनीत किती शास्त्रज्ञ आहेत, किती व्यावसायिक अधिकारी आहे, याबाबत कुणी विचारत नाही. परंतु, पतंजलीबाबत विचारतात, पतंजलीकडे २०० शास्त्रज्ञ असून २० हजार व्यावसायिक प्रशिक्षित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वर्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे प्रदीप मैत्र, वर्षा पाटील, पतंजलीचे यशपाल आर्य उपस्थित होते.

Web Title: Money should be more serious about the black government - Ramdev