'नाणार'वरून विरोधक आक्रमक; कामकाजावर परिणाम

ज्ञानेश्‍वर बिजले
शुक्रवार, 13 जुलै 2018

नागपूर - नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवरून शिवसेना पुन्हा आक्रमक झाली असून, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना नाणार येथील नियोजित रिफायनरी प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दिले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले. प्रकल्प रद्द करण्याची घोषणा हवी आहे, अशी आग्रही मागणी करीत शिवसेनेचे आमदार आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. विरोधकही याच मुद्द्यावर आग्रही होते. या मुद्द्यावर दिवसाभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. 

शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांनी विचारणा केली, की ‘नाणार का जाणार' यांवर हो किंवा नाही, असे स्पष्ट उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. ते पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मित्र उद्धव ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दिले असेलच.‘

ठाकरे यांचे नाव उच्चारताच संतप्त झालेल्या प्रभू म्हणाले, ‘‘ठाकरे यांना प्रेझेंटेशन दाखविलेले नाही. नाणारला आमचा विरोध असून त्यासाठी पडेल ती राजकीय किंमत देऊ.‘ त्यावर पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री इतके दिवस काय करीत होता. प्रभूंना माहीत नसताना ठाकरे यांना प्रेझेंटेशन दाखविले असेल. प्रकल्प झालाच पाहिजे, असे तरी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगावे.‘‘

फडणवीस पाटील यांना उद्देशून म्हणाले,‘‘हो का नाही, असे प्रत्येक गोष्टीचे उत्तर देता येत नाही. याबाबतचे उदाहरण द्यायचे झाल्यास, ‘बायकोने मारणे सोडले का?‘ असा प्रश्‍न एकाला विचारल्यावर हो की नाही, ऐवढ्यात उत्तर देता येत नाही. ठाकरे यांना प्रेझेंटेशन दिले नाही. सुभाष देसाई यांना प्रेझेंटेशन दिले. तेवढ्याचे भागेल असे वाटले, पण भागले नाही. आपणांस नीट प्रेझेंटेशन करू. हा प्रेस्टीज इश्‍यू नाही. वेस्ट कोस्ट रिफायनरी झाली पाहिजे, हे देशहिताचे आहे. नाणारला प्रकल्प लादायची इच्छा नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ.‘‘

Web Title: Monson Session Nanar Project work effect shivsena uddhav thackeray devendra fadnavis