राज्यात पुन्हा मान्सूनधारा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईतील शुक्रवारच्या तापमान भडक्‍यानंतर शनिवारी (ता. २०) कमाल तापमानात ४ अंशांनी घट होऊन ३२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

पुणे -  मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुंबईतील शुक्रवारच्या तापमान भडक्‍यानंतर शनिवारी (ता. २०) कमाल तापमानात ४ अंशांनी घट होऊन ३२.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते, गडगडाटही झाला; मात्र पावसाने फक्त शिडकावा केला. 

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आज (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon again in the state