मॉन्सून 72 तासांत अंदमानात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

पुणे - मॉन्सून येत्या 72 तासांत बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. वातावरणातील बदलांमुळे साधारणतः 20 मेदरम्यान मॉन्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल होतो.

यंदा तो चार दिवस आधी 15 मे रोजी अंदमान, निकोबारमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी मॉन्सून केरळमध्ये काहीशा उशिराने दाखल झाला होता. त्यामुळे यंदा केरळमध्ये केव्हा दाखल होईल, याची उत्सुकता बळिराजाला लागली आहे. महाराष्ट्रात साधारणतः मृग नक्षत्रावर पावसाचे आगमन होते. या वर्षी 8 जून रोजी मृग नक्षत्र सुरू होत आहे.
दरम्यान आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, दक्षिण कर्नाटक, सिक्कीम, तमिळनाडू येथे येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होईल. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर येथे काही ठिकाणी गारपिटीची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या कोकण, गोवा, विदर्भ; तसेच अन्य काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. परिणामी, शनिवारी (ता.13) विदर्भ, मराठवाड्यातील कमाल तापमान चाळीस अंशांवर नोंदले गेले. विदर्भात मंगळवारपर्यंत (ता.16) उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon andaman in 72 hrs.