नाशिकच्या वेशीवर मॉन्सूनला ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : निम्म्याहून अधिक महाराष्ट्र व्यापून टाकणारा मॉन्सून नाशिकच्या वेशीवर थांबला आहे. उत्तर महाराष्ट्रात आठवडाभराने मॉन्सून सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. मॉन्सून धीमा झाला आहे. आठवडाभराने महाराष्ट्रात तो पुन्हा वेग घेईल, अशी माहिती केंद्रीय वेधशाळेचे वरिष्ठ वैज्ञानिक एम. मोहापात्रा यांनी दिली. 

राज्यात मॉन्सून 8 जूनला दाखल झाल्यानंतर वेगाने जवळपास संपूर्ण राज्य व्यापून टाकले. मॉन्सूनने आज मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग व्यापला, असे केंद्रीय वेधशाळेने जाहीर केले. असे असले तरी अद्याप नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पोहचलेला नाही. नाशिकच्या वेशीवर तो थांबला आहे. त्याचा वेग मंदावल्याने आठवडाभर राज्यात अशीच स्थिती राहील. पूर्व आणि इशान्य भारतात मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. तेथे मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांत बंगालचा उपसागर, इशान्येकडील राज्ये आणि पश्‍चिम बंगालमध्ये मोसमी पाऊस पोहचेल, असेही वेधशाळेने स्पष्ट केले. 

दोन दिवसांतील अंदाज 
12 जून : दक्षिण कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता. विदर्भात सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्‍यता. दक्षिण कोकण आणि गोव्यात ताशी 35 ते 55 कि.मी. वेगाने वारे वाहत असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा. 
13 जून : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता. 

Web Title: Monsoon breaks on the entrance of Nashik