मॉन्सूनने देश व्यापला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पुणे - नैॡत्य मौसमी पावसाने (मॉन्सून) संपूर्ण देश व्यापला असल्याचे हवामान खात्याने शुक्रवारी जाहीर केले. कमी दाबाचा पट्टा हिमालयात सरकण्याची शक्‍यता असल्याने मध्य महाराष्ट्राला मात्र पावसासाठी पुढील काही दिवस वाट पाहावी लागेल. राज्यात अद्याप समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. मंगळवारपर्यंत कोकण, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

Web Title: Monsoon covered the country