अखेर आनंदाची बातमी आली, मान्सून महाराष्ट्रात दाखल....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

महाराष्ट्रासाठीची 'ती' आनंदाची बातमी अखेर मुंबईतून समोर येतेय. कारण यंदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.

मुंबई - महाराष्ट्रासाठीची 'ती' आनंदाची बातमी अखेर मुंबईतून समोर येतेय. कारण यंदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक कृष्णानंद होसळीकर यांनी याबाबत माहिती दिलीये. येत्या ४८ तासात मान्सून पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

देवभूमी केरळातून भारतातील मान्सूनची वाटचाल सुरु होते. केरळातून कर्नाटक आणि पुढे महाराष्ट्र असा मान्सूनचा प्रवास असतो. अशात पुढील २ दिवसात मान्सून महाराष्ट्रात आणखी पुढे सरकेल असं होसळीकर यांनी म्हटलंय. 

मोठी बातमी - 'ही' परवानगीही मिळाली, मुंबईतील मद्यप्रेमींसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी

१ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला. त्यानंतर ११ तारखेला म्हणजेच आज हर्णे बंदरातून आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासून पावसाच्या सरी बरसतायत. एकंदर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याने मुंबईतही लवकरच मान्सून दाखल होणार आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक होसळीकर यांनी याबाबत माहिती दिलीये.

मोठी बातमी - ' मुंबईत पुन्हा लागणार कडक लॉकडाऊन ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत...

एकंदरच मान्सूनच्या समाधानकारक वाटचालीमुळे महाराष्ट्रातील बळीराजा आणि महाराष्ट्रातील नागरिक सुखावलेत. 

monsoon has arrived in maharashtra information by krushnanand hosalikar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon has arrived in maharashtra information by krushnanand hosalikar