पुण्यात मॉन्सून आला रे; कोकण, मध्य महाराष्ट्रातही प्रगती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

मॉन्सूनची वाटचाल यंदा अडखळतच सुरू असलेली वाटचालीने महाराष्ट्रात दाखल होताच वेग धरला आहे. यंदा १८ मे रोजी मॉन्सून अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने तब्बल आठवडाभरानंत २५ मे रोजी मॉन्सूनने थोडीशी चाल केली. ३० मे रोजी मॉन्सूनने संपर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्राकडे वाटचाल केली.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २४) संपुर्ण, मराठवाडा, विदर्भ व्यापून, कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्राच्या मालेगावपर्यंतचा भाग व्यापला आहे. रविवारी मॉन्सूनने मोठा टप्पा पार करताना जवळपास निम्मे राज्य व्यापले होते. कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसानंतर वाटचाल केली आहे. येत्या बुधवापर्यंत (ता.२६) मॉन्सून संपुर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनची वाटचाल यंदा अडखळतच सुरू असलेली वाटचालीने महाराष्ट्रात दाखल होताच वेग धरला आहे. यंदा १८ मे रोजी मॉन्सून अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने तब्बल आठवडाभरानंत २५ मे रोजी मॉन्सूनने थोडीशी चाल केली. ३० मे रोजी मॉन्सूनने संपर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्राकडे वाटचाल केली. ५ जून रोजी श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापला. तर यंदा तब्बल आठवडाभर उशीराने ८ जून केरळात आगमन झाले. त्यानंतर १० जून मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्रासह, लक्षद्वीप बेटांचा उर्वरीत भाग, केरळचा बहुतांशी भाग, तामिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केली.

१४ जून रोजी दक्षिण कर्नाटकातील मंगळूरू, मैसूरपर्यंत मॉन्सूनने मजल मारली. त्यानंतर मॉन्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे परिणाम झाला. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर यंदा सर्वांत उशीरा २० जून रोजी मॉन्सून तळ कोकणात पोचला. त्यानंतर मात्र मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे. सोमवारी (ता. २४) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशाचा आणखी काही भागांत चाल केली आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) संपुर्ण राज्य व्यापून, मॉसून दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाच्या काही भागांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon rain arrives in Pune and other part of Maharashtra