मॉन्सूनची शुभवार्ता; 29 रोजी केरळात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) 29 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होतील. सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधीच मॉन्सून भारतात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी व्यक्त केला. अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर 23 मे रोजी मॉन्सून बरसेल, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

मॉन्सून 20 मे रोजी अंदमानच्या दक्षिण समुद्रावर धडकतो. त्याचे हे आगमन यंदा 23 मेपर्यंत लांबणार आहे. अंदमानच्या समुद्रामध्ये मॉन्सूनची प्रगतीस पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे पुढील आठवड्याभरात मॉन्सूनची समाधानकारक प्रगती होईल. केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्याचे हे हवामान खात्याने तेरावे वर्ष आहे. यात एखाद्या वर्षाचा अपवाद वगळल्यास उर्वरित वर्ष हवामान अंदाज अचूक ठरला आहे.

यातून कळते मॉन्सूनचे आगमन
- वायव्य भारतातील कमाल तापमान
- दक्षिण द्वीपकल्पावर होणारा पूर्वमोसमी पाऊस
- दक्षिण चीन सागरातील बहिर्गमनी लांब विद्युतचुंबकीय लाटा
- हिंदी महासागराच्या आग्नेयला हवेच्या खालच्या स्तरातील वारे
- विषुववृत्तीय पूर्व हिंदी महासागरातील वरच्या स्तरातील वारे
- नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील बहिर्गमनी लांब विद्युतचुंबकीय लाटा

पाच वर्षांतील मॉन्सूनचे केरळातील आगमन
वर्ष............अंदाज ............ प्रत्यक्ष आगमन

2013 .......3 जून ............... 1 जून
2014 ...... 5 जून ............... 6 जून
2015 ....... 30 मे .............. 5 जून
2016 ....... 7 जून ............... 8 जून
2017 ....... 30 मे ............... 30 मे

Web Title: monsoon rain keral environment