मॉन्सूनची महाराष्ट्रात हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - वेळेआधी केरळमध्ये दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अखेर शुक्रवारी महाराष्ट्रात हजेरी लावली. एकाच दिवशी कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये धडक मारल्याने पुढील दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून, रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. 

यंदा मॉन्सून 6 ते 8 जूनच्या दरम्यान राज्यात दाखल होईल, असे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले होते. तो अंदाज अचूक ठरवत मॉन्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली. केरळपासून महाराष्ट्रापर्यंतची वाटचाल पूर्ण करण्यास 11 दिवसांचा कालावधी लागला. 

पुण्यात आज दाखल होणार  
मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्या (ता. 9) मुंबईसह पुण्यात मॉन्सूनचे आगमन होईल. तसेच, महाराष्ट्राचा उर्वरित काही भाग, संपूर्ण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागात तो धडक देईल; तर सोमवारपर्यंत (ता. 11) संपूर्ण महाराष्ट्र व्यापून गुजरात, मध्य प्रदेशच्या काही भागात पोचण्याची शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागरात आज (ता. 8) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ईशान्य भारतासह पश्‍चिम बंगाल, सिक्कीमध्येही मॉन्सूनची प्रगती शक्‍य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

महाराष्ट्रातील आगमन 
वर्ष---आगमन 
2011 ... 3 जून 
2012 ... 6 जून 
2013 ... 4 जून 
2014 ... 11 जून 
2015 ... 8 जून 
2016 ... 19 जून 
2017 ... 10 जून 
2018 --- 8 जून 

Web Title: Monsoon rains in Maharashtra