महाराष्ट्रासह देशभरातून मॉन्सूनचा निरोप

Rain-
Rain-

पुणे - नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. १६) महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप घेतला. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

यंदा आठ जून रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्याने चार महिन्यांपेक्षा अधिक काळ देशाच्या विविध भागांत मुक्काम केला. तर, राजस्थानातून सर्वांत उशिराने नऊ ऑक्‍टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मॉन्सूनने आठवडाभरातच परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. 

वायव्य भारतात हवेच्या खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होऊन, पावसाने उघडीप दिल्यानंतर राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर करण्यात येते. सलग पाच दिवस पावसाची उघडीप, सकाळच्या वेळी हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण, वाऱ्यांची बदलेली दिशा आदी निरीक्षणानंतर मॉन्सूनची देशाच्या विविध भागांतील परतीची वाटचाल ठरते. महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्यानंतर देशभरातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते. 

केरळमध्ये यंदा तब्बल आठवडाभर उशिराने दाखल होणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल सुरवातीपासून अडखळत झाली. अंदमानमध्ये १८ मे रोजी पोचलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास लांबला. अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखली, त्यामुळे सात जूनपर्यंत तळकोकणात पोचणारा मॉन्सून १९७२ नंतर प्रथमच २० जून रोजी तळकोकणात पोचला. त्यानंतर मजल दरमजल करत सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच १९ जुलै रोजी मॉन्सूनने देश व्यापला. यंदा जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या कालावधीत देशात ११० टक्के पाऊस पडला. १९९४ नंतर २५ वर्षांनी देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनची परतीची वाटचाल 
वर्ष     राजस्थानातून माघार     देशाचा निरोप 

२०११     २३ सप्टेंबर              २४ ऑक्‍टोबर 
२०१२      २४ सप्टेंबर             १८ ऑक्‍टोबर 
२०१३      ९ सप्टेंबर               २१ ऑक्‍टोबर 
२०१४      २३ सप्टेंबर             १८ ऑक्‍टोबर 
२०१५      ४ सप्टेंबर               १९ ऑक्‍टोबर 
२०१६      १५ सप्टेंबर             २८ ऑक्‍टोबर 
२०१७      २७ सप्टेंबर             २५ ऑक्‍टोबर 
२०१८      २९ सप्टेंबर              २९ ऑक्‍टोबर 
२०१९      ९ ऑक्‍टोबर             १६ ऑक्‍टोबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com