

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीनंतर मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.
भारतीय हवामान विभागानुसार (IMD) ५ दिवसांच्या थांब्यानंतर २३ मे रोजी मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला.
१८ मे रोजी मॉन्सून अंदमान-निकोबार, श्रीलंकेचे काही भाग आणि कोमोरिन क्षेत्रात पोहोचला होता.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी नंतर आता मुंबईतही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने पाच दिवसांच्या थांब्यानंतर शनिवारी (२३ मे) पुन्हा सक्रिय प्रगती केली आहे. मॉन्सूनने १८ मे रोजी संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, श्रीलंकेच्या काही भाग आणि कोमोरिन भागात आगेकूच केली होती. त्यानंतर पुढील पाच दिवस त्याची वाटचाल थबकली होती. मात्र शनिवारी मॉन्सूनने महत्वाची प्रगती साधली.