मॉन्सूनचा उद्यापासून परतीचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

पुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) राजस्थानमधून माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार झाली आहे. राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास उद्यापासून (ता.३०) सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी वादळी पाऊस सुरू असून, आज (ता. २९) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात सध्या वादळी पावसाने हजेरी लावली असून, सकाळी कडक ऊन, दुपारी उकाडा, त्यापाठोपाठ ढग गोळा होऊन सायंकाळनंतर जोरदार पाऊस असे हवामान आहे. रात्रीच्या वेळीही उकाड्यात वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उद्यापासून (ता. ३०) विदर्भ, मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

प्रवासास पोषक स्थिती
मॉन्सूनच्या प्रवाहातील बाष्प कमी झाल्याने गेले काही दिवस राजस्थानसह देशाच्या वायव्य भागात कोरडे हवामान अाहे. या भागात हवेचा दाबही वाढू लागला असून, वाऱ्यांची दिशा बदलू लागली आहे. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत (ता. ३०) मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्यानंतर मजल दरमजल करत मॉन्सून देशाच्या दक्षिणेकडील भागातून परत जाणार आहे. या कालावधीमध्ये कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, महाराष्ट्रासह मध्य भारतातील राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांवर समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Monsoon's return journey from tomorrow