घराणेशाहीला फाटा मारत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, घराणेशाहीला फाटा मारत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या आहेत.

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, घराणेशाहीला फाटा मारत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या आहेत.

पदोन्नत्या झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या सर्व पद्दोन्नती झालेल्या व नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन, मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून राज्यात पुन्हा एकदा सर्वसमावेशक, पुरोगामी व प्रामाणिक सरकार आणण्यासाठी पुढील 100 दिवस तन-मन-धनाने काम करूया.

प्रदेश कार्यकारिणीच्या पदोन्नत्यामध्ये मानस पगार, शिवराज मोरे, नयना गावित रिषिका राका, विजयसिंग राजपूत, अभिजीत शिवरकर, सुमित भोसले, विनोद भोसले, शिवानी वडेट्टीकर, विक्रम ठाकरे यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. तर सतिष गोरे, राहुल संत, संदीप देशपांडे, स्नेहल डोके, बालाजी गाडे, इशाक शेख आदींची चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची परिस्थिती डळमळीत असताना युवक काँग्रेसने पदाधिकाऱ्यांना पदोन्नत्या देऊन आणि निवडी करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत त्यांचा असलेला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद देवरा यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील राजीनामास्त्र चालूच असताना युवक काँग्रेसने नवीन टीम बांधण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 50 percent appointments are first generation activists Maharastra IYC