राष्ट्रवादी'चे अर्धा डझनहून अधिक माजी प्रदेशाध्यक्ष सत्ताधारी पक्षात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची प्रवेशाची रीघ लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अर्धा डझनपेक्षा अधिक प्रदेशाध्यक्षांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.

मुंबई ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची प्रवेशाची रीघ लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अर्धा डझनपेक्षा अधिक प्रदेशाध्यक्षांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे.

1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अनेक दिग्गज नेत्यांनी सांभाळली. सलग पंधरा वर्षे सत्तेत असताना या नेत्यांनी मंत्रिपदेही उपभोगली. मात्र राज्यात 2014 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर हे नेते हवालदिल झाले होते.

भाजपने यंदीचीही लोकसभा निवडणूक एकहाती जिंकल्यामुळे राज्यातही युतीचीच सत्ता येणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसह अन्य लहान मोठ्या पक्षांतील नेत्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. त्याची सर्वाधिक झळ राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसली आहे. काही नेत्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यानच शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या छगन भुजबळ आणि भास्कर जाधव शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

प्रवेशाच्या चर्चेतील नेते 
माजी प्रदेशाध्यक्ष ः छगन भुजबळ, भास्कर जाधव 

प्रवेश केलेले नेते 
माजी प्रदेशाध्यक्ष ः बबनराव पाचपुते, मधुकर पिचड, 
माजी महिला प्रदेशाध्यक्षा ः मंदा म्हात्रे, चित्रा वाघ 
माजी युवक प्रदेशाध्यक्ष ः रणजितसिंह मोहिते पाटील, उदय सामंत, निरंजन डावखरे 
माजी मुंबई विभागीय अध्यक्ष ः सचिन अहिर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than half a dozen former state chiefs of the NCP are in BJP and sena