उन्हाचा चटका आणखी वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - राज्यातील उन्हाचा चटका पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे बुधवारी वर्तविण्यात आला. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे. 

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामान असल्याने दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील नगर, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला. उर्वरित भागात काही प्रमाणात हवामान किंचित ढगाळ होते. विदर्भाच्या उत्तर भागात हवामान कोरडे होते. ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानाबरोबर रात्रीच्याही तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. 

Web Title: more heat in maharashtra