शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी एसटीच्या जादा बस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - रायगड किल्ल्यावर मंगळवारी (ता.5) आणि बुधवारी (ता. 6) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून मागणीनुसार जादा बस सोडाव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते दिले आहेत. या सोहळ्यासाठी येणाऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून जादा बस सोडण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रावते यांच्याकडे केली होती. त्यानुसार 5 आणि 6 जूनला जादा बस सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी दोन्ही वेळच्या प्रवासाकरिता आगाऊ आरक्षण करण्यासाठी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एस. टी.

मुंबई - रायगड किल्ल्यावर मंगळवारी (ता.5) आणि बुधवारी (ता. 6) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून मागणीनुसार जादा बस सोडाव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री दिवाकर रावते दिले आहेत. या सोहळ्यासाठी येणाऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून जादा बस सोडण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रावते यांच्याकडे केली होती. त्यानुसार 5 आणि 6 जूनला जादा बस सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी दोन्ही वेळच्या प्रवासाकरिता आगाऊ आरक्षण करण्यासाठी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एस. टी. महामंडळाने केले आहे. 

Web Title: More ST bus for Shivrajyabhishek celebrations