मच्छर भी जरुरी है! 

Mosquito is Important in Biodiversity Chain
Mosquito is Important in Biodiversity Chain


नागपूर, २१  : ‘एक मच्छर आदमी को...बना देता है़'‘ चित्रपटातील हा संवाद सर्वानाच मुखोद्गत आहे. मात्र हाच डास जैविक साखळीतील महत्त्वाची श्रृंखला आहे. डास वेगवेगळे आजार पसरवून पाळीव प्राणी, वन्यप्राणी आणि माणसांची संख्या मर्यादित ठेवतात. पृथ्वीवरील डास नष्ट झाले तर विविध सस्तन प्राण्यांची संख्या वाढेल. ही बाब लक्षात घेता डास हा सगळ्यांना त्रासदायक कीटक वाटत असला तरी निसर्गात त्याचे मोलाचे काम असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

या पृथ्वीवर असलेला सगळ्यात त्रासदायक कीटक म्हणून आपण डासांकडे पाहतो. त्यांना दूर ठेवण्यासाठी विविध युक्त्या करीत असतो. अमेरिकेत तर संपूर्ण पृथ्वीवरून मच्छर कायमचे नष्ट करण्यासाठी संशोधन करून डासांच्या मार्फतच डास संपुष्टात आणण्याचा शोध सुरू आहेत. त्याच्या यशस्वी चाचण्या झाल्यानंतर जगभरातून डास कायमचे हद्दपार करण्याकडे पाऊल पडते आहे. एकदमच पृथ्वीवरून डास नाहीसे झाले तर कित्ती छान गुड नाइट, ऑल आउट, कछुवा छाप सगळ एकदम बंद.. रात्री निवांत झोप लागेल... असा विचार तुम्ही करत असाल तर जरा थांबा.

डास ह्या पृथ्वीवर गेल्या एक अब्ज वर्षांपूर्वी पासून आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या ३५०० विविध जाती जगभरात सापडतात. त्यापैकी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच प्रजाती आपल्याला त्रासदायक आहेत. मग मूठभर त्रासदायक जातींमुळे मणभर डासांच्या प्रजाती का मारायच्या? असा नवा विचार समोर येऊ लागला आहे.

जैविक साखळीतील डास ही महत्त्वाची कडी. डास नष्ट झाले तर पृथ्वीवर विविध सस्तन प्राण्यांची संख्या हाताबाहेर जाईल. कारण, डास वेगवेगळे आजार पसरवून पाळीव प्राणी, वन्यप्राणी आणि माणसांची संख्या मर्यादित ठेवतात. त्यामुळे जंगलांवर ताण येत नाही. प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवत असल्याने सर्वांना मुबलक अन्न मिळते आहे. 

डासांच्या अळ्या पाण्यात पडलेल्या पालापाचोळा आणि इतर विघटनशील पदार्थामुळे तयार झालेल्या सूक्ष्म जीवांना खातात. त्यामुळे पाण्यातील सूक्ष्म जीवांची संख्या नियंत्रित राहते. या अळ्या पाण्यात श्वास घेत नाहीत तर त्या श्वास घेण्यासाठी दर मिनिटाला पृष्ठ भागावर येतात. तसेच पाण्यातील प्राणवायू कमी करणाऱ्या सूक्ष्म जीवनावर या अळ्या उदरनिर्वाह करीत असल्यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण नियंत्रित राहते. शिवाय या अळ्या सूक्ष्मजीव खातात. सूक्ष्म जीवांमुळे पसरणारे आजार देखील थेट पाणी पिल्याने इतर प्राण्यांना होत नाहीत असा दावाही प्राणिशास्त्राच्या अभ्यासकांनी केला आहे. 

डास हा डायनासोरच्या पूर्वीपासून पृथ्वीतलावर

 डास हा डायनासोरच्या पूर्वीपासून पृथ्वीतलावर आहे. डासांची पूर्वी पावसाळ्यातच उत्पत्ती होत होती. नागरीकरण वाढल्याने पाण्याची साठवणूक केली जात असल्याने त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. हे संकट मानवनिर्मित आहे. डास १०० मीटरपर्यंत प्रवास करतो. डासावर नियंत्रण मिळविण्यासाठी १०० मीटर अंतरावर पाणी साचणार नाही काळजी घ्यावी.  प्रा. भूषण भोईर. प्राणिशास्त्र विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com