"मातोश्री'समोरच खड्डा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

मुंबई - मातोश्रीसमोरचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. महाराष्ट्र नगर ते वांद्रे कॉलनी यादरम्यानचा रस्ता खड्ड्यांमुळे धोकादायक झाला आहे. या रस्त्यांवर कोणतेही वाहन खड्ड्यांमुळे कधीही कलंडून मोठी दुर्घटना घडू शकते. या रस्त्यांवरून बेस्ट बस चालविणे धोक्‍याचे झाल्याने ते दुरुस्त करण्याची मागणी बेस्टने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रवास या रस्त्याने होतो. तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे बेस्टच्या बसेस चालविणे कठिण झाले असून कधीही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करीत बेस्टच्या धारावी आगारप्रमुखांनी पालिका आयुक्त मेहता यांना पत्र पाठवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांना पत्र पाठवून आठवडा झाला तरी अजूनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. स्थानिक नगरसेवक इलियास शेख यांनाही पत्र पाठवून बेस्टने रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करा अशी मागणी केली आहे; मात्र बेस्टच्या पत्रावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. या रस्त्यांवर खड्डे एवढे आहेत, की त्या रस्त्यांवरून गाड्या चालविणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे मातोश्रीसमोरचा सिग्नल वाहनांनी ब्लॉक होतो. सिग्नलवरील वाहतूक काही दिवसांपासून मंदावली आहे. मातोश्रीवरील वाहने याच रस्त्यांवरून जात आहेत. म्हाडा आणि पालिकेच्या वादातून या रस्त्यांची कामे रखडली आहेत. मातोश्रीसमोरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिका यांच्या वादातून रखडला आहे.
 
मातोश्रीला खड्डे दिसत नाहीत काय?
समोरच्या रस्त्यांवरील खड्डे वाहनांसाठी धोकादायक झाले आहेत. पेव्हर ब्लॉकने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खोल खड्ड्यांमध्ये दुर्घटना घडू शकते. खड्ड्यांची चाळण झाली असताना मातोश्रीला खड्डे दिसत नाहीत काय, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Web Title: "Mother" in front of the pit