Nashik News : आईला करावी लागली मुलीची प्रसूती; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाचा प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News : आईला करावी लागली मुलीची प्रसूती; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाचा प्रस्ताव

Nashik News : आईला करावी लागली मुलीची प्रसूती; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाचा प्रस्ताव

नाशिकः काल नाशिक येथील अंजनेरी प्राथमिक केंद्रावर कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे आईला मुलीची प्रसूती करावी लागली होती. या घटनेने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. या प्रकरणी आता दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात बरड्याचीवाडी गावची यशोदा आव्हाटे ही महिला प्रसूतीसाठी गेली असता अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने आईनेच मुलीची प्रसूती केली. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचाः परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

सदरील महिला आई आणि आशा वर्करसोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. आईच्या मदतीने प्रसूती होताच यशोदा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. जागतिक महिला दिनाच्या दोन दिवस अगोदर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आता आरोग्य विभागाकडून उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आरोग्य विभागाचे वाभाडे निघत आहेत.

टॅग्स :Nashikhealth