गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता अडचणीत 

गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता अडचणीत 

मुंबई - एम.पी. मिल कंपाउंड प्रकरणात गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी विकासकाला झुकते माप दिल्याप्रकरणी राज्याच्या लोकायुक्‍तांनी त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या संदर्भात विरोधकांनी महेता यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना महेता यांनी संबंधित वृत्त फेटाळले. 

‘एसआरए’ प्रकरणात महेता यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत राज्याचे लोकयुक्त एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात प्रकाश महेतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती आहे. 

एम.पी. मिल कंपाउंडच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र या निर्णय प्रक्रियेत आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विकासकाच्या फायद्यासाठी मंत्रिमहोदयांनी निर्णय घेतल्याचे मतही लोकयुक्तांनी व्यक्त केले आहे. ‘मुख्यमंत्र्यांना याबाबतची कल्पना नव्हती, फाइलवर चुकून तसा शेरा मारण्यात आला,’ अशी कबुली महेता यांनी दिली आहे. 

काय आहे प्रकरण? 
मुंबईतील ताडदेवमधल्या एम.पी. मिल कंपाउंड इथल्या ‘एसआरए’ प्रकल्पात एफएसआय गैरव्यवहार केल्याचा आरोप महेता यांच्यावर आहे. ‘एस.डी. कॉर्पोरेशन’ या विकासकाला फायदा देण्यासाठी महेता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी राज्यपालांनी लोकायुक्त चौकशीची परवानगी दिल्यानंतर ‘म्हाडा’, ‘एसआरए’ आणि गृहनिर्माण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांपुढे हजेरी लावली होती. 

लोकायुक्‍तांचा अहवाल आल्याची कल्पना नाही. अहवाल आला असेल आणि त्यात माझ्या विरोधात काही लिहिलेले असेल आणि ते खरे असेल तरच यावर मी भाष्य करू शकेन. मात्र, हे वृत्त कुठून आले तेच मला माहिती नाही. 
- प्रकाश महेता, गृहनिर्माणमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com