Eknath Shinde: ...ते खरं ठरलं! शिवसेनेत दोन गट; बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde: ...ते खरं ठरलं! शिवसेनेत दोन गट; बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर भाजपला त्यांनी अजगराजी उपमा दिली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा शाब्दिक युद्ध पेटणार असं स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान संजय राऊत म्हणाले, की भाजप, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्र पणाने वागत होती, आणि शिवसेनेला संपवण्याचा त्यांचा कट होता म्हणून शिवसेना भाजप पासून वेगळी झाली. भाजप पक्ष हा मगर, अजगर आहे, आत्ता पर्यत जे जे त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांनी त्यांनी खाऊन टाकलं आहे.

आता शिंदे गटाला अनुभव येत आहे. आता त्यांनी कळेल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. तर शिंदेंच्या शिवसेनेत पडलेल्या गटावर बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे असलेल्या महितीनुसार शिंदे गटामध्ये नाराजी आहे, आणि त्या गटामध्ये दोन गट पडले आहेत .

मात्र गजानन किर्तीकर यांनी सांगितलं तिच भूमिका शिवसेनेची पहिल्यापासून होती. त्यामुळे आम्ही भाजप पासून दूर गेलो, त्यांनी शब्द पाळले नाहीत, निधी मिळवून दिला नाही, शिवसेनेच्या आमदारांची कामे कारत नाहीत, शिवसनेच्या प्रमुख नेत्याचा अपमान केला असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

टॅग्स :CM Eknath Shinde